आनंदी राहावं, सतत आनंद मिळावा, यासाठी सर्व माणसांची धडपड असते. नव्हे, तशी ती असावीच अन्यथा आयुष्य हे नीरस, कंटाळवाणे होऊन जगणेच निरर्थक वाटू लागते. यातूनच मग नैराश्य, विविध मानसिक, शारीरिक आजार मागे लागतात. आनंदी जगण्याविषयी, सतत सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, लोकांना दिलासा मिळावा, मार्ग दिसावा म्हणून डॉ धनजंय वारे आपल्या पोर्टल तर्फे नेहमीच प्रयत्नशील असतात. त्या दृष्टीने विविध उपक्रम, लेख, यशकथा ते आपल्याला सांगत असतात. उद्देश हाच की, कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी खचू नका. धीर धरा. प्रतिकूल परिस्थिती बदलेल यासाठी आशावादी रहा. त्या साठी योग्य प्रयत्न करा. आपण आनंदाने जगण्याचा आणि आनंदाने जगू देण्याचा संकल्प करू या आणि तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करू या.
लेखक –
डॉ धनंजय वारे
एम डी (मेडिसिन, मुंबई), डी. एम (कार्डिओलॉजी, मुंबई)