रक्तवाहिन्यांमार्फत हृदयाकडून शरीराच्या सर्व भागांना सुरळीतपणे रक्तपुरवठा चालू असतो . पण काही वेळेस हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन हृदयाकडे होणारा रक्तप्रवाह खंडित होतो व परिणामी हृदयाचे स्नायू निकामी होतात. यालाच हृदयविकाराचा झटका असे म्हटले जाते. हल्ली या आजाराचे प्रमाण खूपच वाढले आहे. योग्य वेळेत उपचार न भेटल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो . म्हणून या मजकुरात हृदयरोगतज्ञ् डॉ. धनंजय वारे यांनी हृदयविकाराचा झटका व त्यावरील उपचारांवर सविस्तर माहिती दिली आहे.
सर्वात प्रथम आपण हृदयविकाराचा झटका याची लक्षणे जाणून घेऊ या. हि लक्षणे व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असू शकतात. त्यातील काही मुख्य लक्षणे पुढीलप्रमाणे :
- छातीत दुखणे
- अस्वस्थता
- छातीवर दाब
- थकवा येणे
- दम लागणे
- हात, पाय, मान यामध्ये वेदना
- श्वास घेण्यास त्रास
- थंड घाम येणे
यापैकी आपल्याला कोणतेही लक्षण जाणवत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे
हृदयविकाराचा झटका येण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे हृदयाला रक्त पुरवणाऱ्या धमन्यांमध्ये plaque तयार होतात. हे plaque कोलेस्ट्रॉल ,चरबी यापासून तयार झालेले असतात. ते धमन्यांच्या भिंतीवर जमा होतात व त्यामुळे हृदयाच्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होऊन झटका येतो.
हृदयविकाराचा झटका येण्याची अजून काही कारणे आहेत ती खालीलप्रमाणे :
- उच्च रक्तदाब
- उच्च कोलेस्ट्रॉल पातळी
- धूम्रपान
- मधुमेह
- लठ्ठपणा
- तणाव
- अनुवंशिकता
- व्यायामाचा अभाव
उपचारपद्धती:
हृदयविकार झटका यावरील उपचारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- औषधप्रणाली: एखाद्या रुग्णाला झटका आल्यास त्याला ऍस्पिरिन, नितरोगलयसेरीन किंवा रक्त पातळ करणाऱ्या या गोळ्या देतात.
- आहार: पोषक आहार हा शरीरासाठी खूप महत्वाचा भाग आहे.
- शस्त्रक्रिया: जेव्हा हृदयविकाराचा झटका खूप मोठा असतो तेव्हा डॉक्टर शस्त्रक्रियांचा सल्ला देतात. त्यातील काही मुख्य शस्त्रक्रिया –
- अँजिओप्लास्टी: यांत चेपलेली धमनी खुलते आणि रक्तप्रवाह सुरळीत केला जातो
- कोरोनरी बायपास आर्टरी: यांत शरीराच्या दुसऱ्या भागातून निरोगी अवयव चेपलेल्या धमनीच्या जागी शिवून रक्तप्रवाहाला मार्ग मोकळा केला जातो.
हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काय करावे?
हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल किंवा येऊ नये यासाठी आपण खालील काळजी घ्यावी:
- धूम्रपान करू नये
- पोषक आहार घ्यावा
- हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये भरपूर प्रमाणात खावी
- वजन नियंत्रणात ठेवावे
- नियमित व्यायाम करावा
- नियमित रक्तदाब तपासणी करावी
- योग्य प्रमाणात झोप घ्यावी
- तणाव टाळावा
ह्या छोटछोट्या गोष्टींमधून आपण खूप मोठा धोका टाळू शकतो. व आपल्या हृदयाची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो.