उच्चरक्तदाब म्हणजे अशी अवस्था ज्यात मानवी शरारीरातील धमन्यांवर साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब निर्माण होणे. उच्चरक्तदाबामुळे धमन्यांवर मोठया प्रमाणात ताण पडला जातो. हल्लीच्या काळात उच्चरक्तदाबाचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे. त्याचे मुख्य कारण तणाव आहे. तरुणांमध्ये उच्चरक्तदाब जास्त दिसून येतो. उच्च रक्तदाब म्हणजे हृदय, किडनी, मेंदू इत्यादी महत्त्वाच्या अवयवांच्या आजारास निमंत्रण आहे. उच्चरक्तदाब हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही म्हणून त्याला सायलेंट किलर (Silent Killer)असेही म्हणतात.
उच्चरक्तदाबाचे मुख्य दोन प्रकार आहेत :
- सिस्टॉलीक ब्लड प्रेशर : या प्रकारात रक्तदाब १२० मिमी पारापेक्षा कमी असणे गरजेचे आहे
- डायस्टोलिक ब्लड प्रेशर : यात शरीरातील रक्तदाब ८० ते ९० मिमी या पातळीत असतो.
जर रक्तदाब हा १२० मिमी पेक्षा जास्त असेल तर त्याला उच्चरक्तदाब असे म्हणतात.
उच्चरक्तदाबाची कारणे:
हृदयरोगतज्ञ् डॉ. धनंजय वारे यांच्या मते उच्चरक्तदाबाची अनेक कारणे आहेत. त्यातील काही मुख्य कारणे पुढीलप्रमाणे :
- तणाव
- धूम्रपान
- व्यायामाचा अभाव
- आहारात जास्त मिठाचे प्रमाण
- वाढलेले वजन
- अनुवांशिक आजार
- आधुनिक जीवनशैली
आपले शरीर हीच आपली सर्वांत मोठी संपत्ती आहे.हृदय हे शरीराचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे त्याची नीट काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयाच्या धमन्यांवर ताण निर्माण झाला तर उच्चरक्तदाब होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी डॉ. धनंजय वारे यांनी खालील उपचार सांगितले आहेत.
उच्च रक्तदाब नियंत्रित करताना:
- नियमित व्यायाम करावा
- संतुलित आहार घ्यावा
- आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावेत
- महिन्यातून एक वेळेस रक्तदाब तपासणी करावी.
- एखाद्या व्यक्तीला उच्चरक्तदाब असेल तर त्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत.
बऱ्याच वेळी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी एकापेक्षा जास्त औषधांची गरज भासू शकते. तुम्ही उच्च रक्तदाबासाठीची नुकतीच औषधे सुरू केली असल्यास, खालील मुद्दे लक्षात ठेवावेत :
- तुम्ही औषधे नियमित घेतली पाहिजेत.
- औषधांचा काहीही परिणाम होत नाही, असे तुम्हाला वाटत असले, तरीही त्यांचे शरीरात कार्य चालू आहे, हे लक्षात ठेवावे
- औषधांमुळे वजन वाढणे, थोडासा थकवा जाणवण्यासारखी लक्षणे दिसत आहेत, असे वाटले तरीही ही औषधे बंद करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- डॉक्टरांनी सांगितलेल्या दिवशी जाऊन वेळोवेळी रक्तदाबाची तपासणी करा.
जर आपल्याला उच्चरक्तदाब किंवा उपचार पद्धती बद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर आपण हृदयरोगतज्ज्ञ डॉ. धनंजय वारे यांचा सल्ला घ्या. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर कॉल करा :९६५७६१३६३५