हृदयरोग म्हणजे अशी अवस्था ज्यात हृदय आणि रक्त वाहिन्यांवर परिणाम होतो . हृदयाला प्राणवायूयुक्त रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास हृदयरोगाचा धोका संभवतो . सध्याच्या काळात हृदयरोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे . त्यात अरिथमीया , कोरोनरी अरिटरी रोग आणि जन्मजात हृदयरोग यांचा समावेश होतो . भारतात वृद्धांपेक्षा तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण जास्त आहेत . आधुनिक जीवनशैली , तणाव, उच्च रक्तदाब ,डायबिटीज आणि धूम्रपान यांमुळे मागील दहा वर्षात हृदयरोग रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे आणि विशेष म्हणजे , यात शंभरातील ३५ रुग्ण हे चाळीस वर्षाखालील आहेत.
हृदयरोगाचे प्रकार :
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. धनंजय वारे यांच्या मते, हृदयरोगाचे अनेक प्रकार असू शकतात .लहान मुलांमध्ये असणाऱ्या हृदयरोगाला कंजायन्टस हार्ट डिसीज म्हणजे नवजात हृदयरोग म्हणतात. हाच हृदयरोग मध्यमवयीन किंवा तरुणांमध्ये रोमँटिक हार्ट डिसीज म्हणून ओळखला जातो. मध्यमवयापासून नंतरच्या काळात हा आपल्याला परिचित असलेला हार्ट अटॅक.
हृदयरोगाचे काही मुख्य प्रकार :
- हार्ट फेल्युअर : या प्रक्रियेमध्ये हृदयाचे स्नायू कमकुवत किंवा ताठर होत जातात. त्यामुळे हृदयाची आंकुचन – प्रसारणाची क्रिया मंदावते.
- हार्ट अटॅक : हृदयरोगाचा हा प्रकार तर आपल्या सर्वाना ज्ञात आहे. हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये काही अडथळा निर्माण झाला तर हृदयापर्यंत रक्त व्यवस्थितपणे पोहचू शकत नाही . या अडथळ्यांमुळे हृदयामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होऊन वेदना सुरु होतात . काही वेळेस या परिस्थितीत ऑक्सिजनचे देखील प्रमाण कमी होते.परिणामी हृदयाचे रक्ताभिसरण थांबले जाऊन काही भाग निष्क्रिय होतो आणि शरीर हा भाग पुन्हा सक्रिय करू शकत नाही.
हृदयरोगाची मुख्य कारणे:
डॉ. धनंजय वारे म्हणतात कि, हृदयरोगाची कारणे रोगाच्या प्रकारानुसार वेगवेगळी असू शकतात.
हृदयरोगाची काही मुख्य कारणे खालील प्रमाणे :
- उच्च रक्तदाब: उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीमध्ये हृदयरोग होण्याची जास्त शक्यता असते
- धूम्रपान: अति धूम्रपान हे देखील एक हृदयरोगाच कारण आहे.
- मधुमेह: मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा धोका होऊ शकतो.
- वाढलेले वजन: शरीरातील जास्त चरबी हृदयाकडे जाणाऱ्या रक्त पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण करते. त्यामुळे जास्त वजन असणाऱ्या व्यक्तीमध्ये हृदयरोगाची लक्षणे दिसू लागतात.
- तणाव: शरीरात होणाऱ्या अनेक रोगांचं मुख्य कारण तणाव आहे. सध्याच्या काळात तरुणांमध्ये हृदयरोग वाढण्याचे कारण तणाव आहे.
- अनुवंशिकता: गर्भवती आईच्या औषधांमुळे किंवा तब्ब्येतींच्या कारणांमुळे किंवा आनुवंशिकतेमुळे बाळाच्या हृदय वाढीवर परिणाम दिसून येतो.
हृदयरोग उपचारपद्धती:
हृदयाची योग्य काळजी घेणे खूप आवश्यक आहे कारण हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे . जर आपल्याला हृदयरोग असेल किंवा त्याची काही लक्षणे जाणवत असतील तर खालील उपचार करावेत:
- व्यायाम: व्यायाम हा सर्वच आजारांसाठी योग्य उपचार आहे. हृदयरोग असणाऱ्या व्यक्तीने दररोज एक – दीड तास व्यायाम करणे आवश्यक आहे .
- आहार: पौष्टिक आहार हा देखील हृदयरोग्यांसाठी खूप भाग आहे. आपल्या आहाराचे योग्य नियोजन करून देखील सुद्धा हृदयरोगाचा उपचार केला जाऊ शकतो.
- औषधे: जर आपल्याला हृदयरोगाची काही लक्षणे जाणवत असतील तर हृदयरोगतज्ज्ञाचा सल्ला घेऊन योग्य ती औषधे घ्यावी.
- तसेच धूम्रपान टाळणे हा एक सर्वात मोठा उपचार असू शकतो.
जर आपल्याला हृदयरोग किंवा उपचार पद्धती बद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर आपण हृदयरोगतज्ज्ञ डॉ. धनंजय वारे यांचा सल्ला घ्या. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर कॉल करा :९६५७६१३६३५